तानाजी सांवत यांच्या जागेवर निवडणूक लागली, 'या' तारखेला होणार मतमोजणी | झुंजार झेप न्युज

0 झुंजार झेप न्युज

राज्यातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी ३१ जानेवारी २०२० ला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून ४ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने आज यवतमाळ विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
असा असणार पोट निवडणुकीचा कार्यक्रम
यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेसाठी ३१ जानेवारी २०२० ला मतदान घेण्यात येणार आहे. ७ जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी असून १५ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर ४ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल. यवतमाळ विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा ५ डिसेंबर २०२० पर्यंत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.