बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक; व्यापारी संघटनांचा पाठिंब्यास नकार

0 झुंजार झेप न्युज

देशात सीएए आणि एनआरसी विरोधात वातावरण तापले आहे. त्यातच आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (ता. 29) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात हि हाक दिली असून व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळू शकतो. अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मात्र सततच्या बंदचा परिणामांना त्रासलेल्या व्यापाऱ्यांनी आजचा भारत बंद पाळणार नसल्याचे निवेदनपरळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिलं आहे. सरकारविरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्‍यावर होत आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत, असं निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.