मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित

0 झुंजार झेप न्युज

प्रतिनिधी :
पुणे : कोणत्याही प्रसंगाला मी हिंमतीने सामोरं जातो. त्यामुळे समोर कितीही मोठा माणूस असू द्या त्याला मी घाबरत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर माझ्यावर अंगावर या, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलखुलास बातचीत केली. माणूस मृत्यूला किंवा तुरुंगात जायला घाबरतो. पण मी कशालाही घाबरत नाही. त्यामुळे कुणालाही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी पत्रकारीतेत आलो. मला पत्रकार म्हणवून घेण्यास आवडतं. पत्रकारीतेत असताना मुंबईतील गॅगवाॅर जवळून पाहता आला. मी गँगस्टर दाऊद इब्राहिमला सुद्धा दम भरलाय, असं राऊत म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर माझा खूप विश्वास आहे. तसेच राज ठाकरे अजूनही माझे चांगले मित्र आहेत, अशी दिलखुलास उत्तरं संजय राऊतांनी दिली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.