तब्बल 644 नक्षलवाद्यांची आसाममध्ये शरणागती

0 झुंजार झेप न्युज

गुवाहाटी : आसाममध्ये नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. राज्यात बंदी घालण्यात आलेल्या आठ संघटनांच्या 644 नक्षलवाद्यांनी गुरूवारी 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेच्या सदस्यांनी एका कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणे म्हणजे राज्य पोलिसांचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी पत्रकारांना सांगितले की, "राज्यासाठी आणि आसाम पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण दिवस आहे. आठ नक्षलवादी संघटनांच्या एकूण 644 कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे."
याचबरोबर, या नक्षलवाद्यांकडून जी शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. यात एके-47, एके-56 यांसारख्या अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. आसामसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा पोलीस दलात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आसामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
Guwahati: 644 cadres of 8 militant groups today surrendered at the Arms Laying Down Ceremony, in presence of Assam Chief Minister Sarbananda Sonowal.
View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter
363 people are talking about this

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.