पुण्याच्या मोठमोठ्या सोसायटीत कोरोनाचा प्रकोप, दोन आठवड्यात 121 कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊनची टांगती तलवार?

0 झुंजार झेप न्युज

शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाला घोषीत करावी लागली आहेत.

पुणे : शहरात कोरोनाने  पुन्हा एकदा हैदोस सुरु केलाय. गेल्या काही दिवसांत सातत्याने शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतीय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाला घोषीत करावी लागली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण जर असेच वाढत राहिले तर पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोरोना रुग्णांत वाढ, लॉकडाऊनची टांगती तलवार?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाला घोषीत करावी लागली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण जर असेच वाढत राहिले तर पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण

पुणे शहरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यामध्ये जवळपास 95 टक्के मोठ्या सोसायट्या तसेच इमारती आहेत. कोरोना रुग्णवाढ झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक असल्याचं देखील समोर आलंय.

शहरातील सर्वाधिक 19 प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. त्यातही प्रामुख्याने औंध-बाणेर, हडपसर, कोथरूड तसेच सिंहगड रस्ता परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचं समोर आलंय.

पुणे पालिका प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर

पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक नियम जाहीर करण्यात आलेत. त्यानुसार जे नागरिक नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई देखील करण्यात येत आहे. तसंच कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा क्वारंन्टाईन सेंटर सुरु करण्यात आलंय तसंच लसीकरणाची मोहिमही जोरदारपणे राबवण्यात येत आहे.

क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रतिबंधित क्षेत्र…

औंध-बाणेर – 19, कसबा- विश्रामबाग – 9, कोंढवा- येवलेवाडी – 11 , कोथरूड- बावधन -14, ढोले-पाटील रस्ता – 2, धनकवडी-सहकारनगर – 13, नगर रस्ता- 3 , बिबवेवाडी 10, वानवडी- रामटेकडी – 6, वारजे-कर्वेनगर – 4, शिवाजीनगर- घोले रस्ता – 9, सिंहगड रस्ता – 9, हडपसर मुंढवा 7

पुणे जिल्ह्यातली कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव

पुणे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावांची संख्या वाढली आहे. पाच दिवसांपूर्वी केवळ 50 गावे हॉटस्पॉट होती, यामध्ये आता 17 गावांची भर पडलीय. जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या आता 67 गावांवर जाऊन पोहोचली आहे.

कोरोनाचा हैदोस, महापालिकेचे नवे आदेश काय?

पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहील.

लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) 50 टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.