…तर राज्य सरकारच्या माध्यमातून लस निर्मिती करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0 झुंजार झेप न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

नंदुरबार : राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यावर लॉकडाऊन हा मार्ग आहे. नवा स्ट्रेन महाराष्ट्रात अद्याप नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज (शुक्रवार) नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली. 

लस घेतली तरी मास्क वापरणं बंधनकारक

“राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यावर सध्या लॉकडाऊन हा मार्ग आहे. मात्र जनता मला सहकार्य करणार याची खात्री आहे. कोरोना लस ही एक ढाल आहे. त्यामुळे लोकांनी ही लस टोचून घ्यावी. कोणतीही भीती मनात ठेवू नका. पण लस घेतली तरी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

महाराष्ट्र सरकारकडून लस निर्मिती

“महाराष्ट्रात कोरोना लस कमी पडणार नाही, याची खात्री केंद्र सरकारने दिली आहे. केंद्राने पुरवठा नियमित होईल असे सांगितले आहे. तसेच ICMR मार्गदर्शनाखाली भारत बायोटेक जी कोरोना लस बनवत आहे. तिचं उत्पादन महाराष्ट्रात करु इच्छितो, तर त्याला परवानगी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी याबाबतचा प्रस्ताव द्या त्याला मंजूरी देतो, असे सांगितले आहे.

त्यानुसार येत्या काही दिवसात हा प्रस्ताव पाठवला जाईल. या प्रस्तावावर सकारात्मक परवानगी मिळाली तर येत्या काही महिन्यात ही लस बनवली जाणार आहे. हाफकीन माध्यमातून, महाराष्ट्र सरकार लस निर्मिती करेल,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य केंद्रांची पाहणी

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी सकाळी नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगाव येथील आरोग्य केंद्रांची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांचा दौऱ्याला नाशिकमधील ओझरहून सुरुवात झाली. तिथून ते नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावला पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी कोरोना लसीकरणाच्या संदर्भातील माहिती घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.