फलटण-पुणे प्रवास आणखी सोपा, प्रकाश जावडेकरांच्या हस्ते नव्या गाडीला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या वेळापत्रक

0 झुंजार झेप न्युज

फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना नव्या पुणे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.

पुणे : फलटण ते लोणंद मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेचा आज शुभारंग झाला. त्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना पुणे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे. प्रवासाची सोय झाल्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणे यानंतर सोपे होणार आहे.

नव्या रेल्वेमुळे दळणवळण सोपे होणार

या कर्यक्रमाला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून सहभाग नोंदवल्यानंतर जावडेकर यांनी फलटण, लोणंद आणि पुणे या मार्गावर दळणवळण सोपे होणार असल्याचे सांगितले. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचेसुद्धा कौतूक केले. गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये व्यापक बदल दिसत असल्याचे ते म्हणाले.

रेल्वेमध्ये मोठे बदल

यावेळी बोलताना गोयल यांनी भारतीय रेल्वेत झालेल्या बदलांचा उल्लेख केला. “रेल्वेमंत्री म्हणून पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात आयआरसीटीसीवरील आरक्षणामुळे प्रवाशांना तिकिटे जलद गतीने मिळण्यास मदत झाली. रेल्वे विद्युतीकरणाची प्रगती, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, रेल्वेची बंदर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधांमुळे अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना मिळाली आहे. 5000 हून अधिक रेल्वे स्थानकांत वाय-फाय प्रदान करण्यात आले आहेत,” असे गोयल म्हणाले.

फलटण-पुणे रेल्वेचे वेळापत्रक

>>>31 मार्च पासून नियमितपणे सुरू होणारी सेवा खालीलप्रमाणे असेल

>>> 01435 DEMU पुण्याहून सकाळी 5.50 ला निघून रेल्वे लोणंद येथे 7.50 ला पोहोचेल त्यानंतर 8.00 वाजता लोणंदहून निघून सकाळी 9.35 वाजता फलटणला पोहोचेल.

>>> 01434 सकाळी 11.00 वाजता फलटणहून निघेल आणि दुपारी 12.20 ला लोणंद येथे पोहोचेल.

>>> 01433 दुपारी 3.00 वाजता लोणंदहून निघेल आणि 4.20 वाजता फलटणला पोहोचेल

>>> 01436 संध्याकाळी 6.00 वाजता फलटणहून निघेल आणि संध्याकाळी 7.10 वाजता लोणंदला पोहोचेल. 7.20 ला लोणंदहून निघून पुण्यात रात्री 9.35 ला पोहोचेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.