गावठी बॉम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न, मोठा अनर्थ टळला

0 झुंजार झेप न्युज

 गावठी बाँम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात घडला आहे.

कोल्हापूर : गावठी बाँम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात घडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हा गावठी बॉम्ब  निकामी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार जिह्यातील जयसिंगूर शहरात एक रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी अज्ञाताने रुग्णालयाच्या परिसरात गावठी बॉम्ब प्लान्ट केला होता. याच परिसरात विस्फोटासाठी लागणारं पुरक साहित्य दोन दिवसांपासून एका गोणीमध्ये पडून होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.

पोलिसांना बॉम्ब निकामी केला

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना सूत्र हालवले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी गावठी बॉम्ब निकामी केला. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, जयसिंगपूरसारख्या शहरात गावठी बॉम्बच्या मदतीने थेट रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून तापसातून लकवरच या प्रकरणाशी निगडीत बाबी समोर येतील असे सांगितले जात आहे.

जिलेटीन कांड्या आढळल्यानं खळबळ

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी 19 मार्च रोजी जप्त केल्या होत्या. त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले होते. या प्रकरणाने संपूर्ण अमरावतीसुद्धा जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता, याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. मात्र, या प्रकरणा ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असून एक आरोपी फरार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.