सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ हवाई वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे आय.आर.बी.ला आदेश

0 झुंजार झेप न्युज

चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत आय. आर. बी. ला दिले. डीजीसीएच्या निकषानुसार विमानतळाच्या धावपट्टीचे काम लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी खुले करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 74 वी बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्यातील विविध विमानतळांच्या विकास कामांचा तसेच तेथील सेवा सुविधांबाबत देखील आढावा घेण्यात आला.

चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिह्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डीजीसीएने त्रुटी काढल्या होत्या. तसा अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे यासाठी विमानतळ विकास कंपनी आय. आर. बी., एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुखमंत्र्यानी दिले आहेत.

या बैठकीत विविध विमानतळ विकास कंपनीच्या गत वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरू केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱयांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाइट लँडिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.