जांबरुंगमध्ये शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच घंटागाडी व रुग्णवाहिकेचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

0 झुंजार झेप न्युज

जांबरुंगमध्ये शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच घंटागाडी व रुग्णवाहिकेचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

रायगड,दि.4 : खालापूर तालुक्यातील जांबरुंग येथील प्राथमिक शाळेचे अल्टा लॅबोरेटरी प्रा.लि. यांच्या सीएसआर फंडातून नूतनीकरण झालेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन, घंटागाडीचे लोकार्पण तसेच नित्यानंद इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या सौजन्यातून मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण काल(3जुलै) रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कामाबद्दल सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी करोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर्स व त्याच्या सहकाऱ्यांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला होता.जांबरुंग ग्रामपंचायत परिसर सध्या विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. या क्षेत्रात जांबरुंग धरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. ग्रामपंचायत सरपंच श्री.रमेश खांडेकर हे सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन अल्टा लॅबोरेटरी प्रा.लि. व नित्यानंद इन्फ्रास्ट्रक्चर या व्यवस्थापनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाल्याने

अल्टा लॅबोरेटरी प्रा.लि. यांच्या सीएसआर फंडातून प्राथमिक शाळा जांबरुंग च्या नूतन इमारतीचे उद्घाटन, घंटागाडीचे लोकार्पण तसेच नित्यानंद इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या सौजन्यातून मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी करोना काळात जांबरुंग पंचक्रोशीत करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उल्लेखनीय सेवा बजावलेल्या डॉ.राजेश पाटील, डॉ.नितीन पाटील व त्यांच्या सहकारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव सोहळा संपन्न झाला.

यावेळी अल्टा लॅबोरेटरी प्रा.लि.च्या संचालिका श्रीमती गिता धोटे, नित्यानंद इन्फ्रास्ट्रक्चरचे नितीन प्रभू, अल्टा कंपनीचे पदाधिकारी श्री.म्हात्रे, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, संतोष बैलमारे, कुमार दिसले, प्रसाद पाटील, पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, सदस्य अक्षय पिंगळे, सरपंच रमेश खांडेकर, उपसरपंच संदेश कांबळे, ग्रामसेवक शरदचंद्र पवार, सदस्य भगवान तांडेल, अर्चना गायकर, अनंता मेंगाळ, पदिबाई मेंगाळ, मदन खोपडे, सुचिता पाटील, सोनाली खोपडे, लक्ष्मीबाई वाघमारे, विजय देशमुख, रवी रोकडे, प्रभाकर पाटील, वसंत कर्णिक, गोपीनाथ पाटील, चंद्रकांत खोपडे, किरण हाडप, निलेश दळवी, राजू खांडेकर, राजेंद्र देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.