एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स, अचानक प्रकृती खालावली, महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पत्रकार परिषद रद्द

0 झुंजार झेप न्युज

एकनाथ खडसे यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.

मुंबई : पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.

जावयाच्या अटकेनंतर काही तासांतच खडसेंना ईडीचं समन्स

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना परवा मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली. तसंच खडसेंना देखील अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स समजावलं.

खडसेंंची पत्रकार परिषद रद्द

आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसेंना रद्द करावी लागलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.