गंभीर समस्येची दखल घेत उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता JCB उपलब्ध करुन दिले.

0 झुंजार झेप न्युज

गंभीर समस्येची दखल घेत उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता JCB उपलब्ध करुन दिले.

पुणे,दि.9 जुलै : मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बोपोडी भिंतीलगत व नाईक चाळ येथील साळवे नगर येथील कमानीसमोर खूप वर्षांपासून राडारोडा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती.यातुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.या गंभीर समस्येची दखल घेत उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता  JCB उपलब्ध करुन दिले 

व उपमहापौर सौ.सुनिताताई वाडेकर यांनी स्वता थांबुन हे काम करून घेतले यांच्या सोबत व आरोग्य निरीक्षक शीलाताई वासकर व या विभागाचे मोकादम सिद्धार्थ बागूल यांनी JCB च्या साह्य़ाने मैदाना मधील केरकचरा व राडारोडा हटवुन मैदानाचा सर्व परिसर व साफसफाई करून घेतले.याप्रसंगी आण्णा आठवले,आप्पासाहेब वाडेकर,रमेश ओव्हाळ,प्रमोद शिंदे,सोमनाथ जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.