भाजपचा पोलखोल कँम्पेन रथावर चेंबूरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र निषेध केला आहे

0 झुंजार झेप न्युज

भाजपच्या पोलखोल कँम्पेन रथावर चेंबूरमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई,दि.19 : भाजपच्या पोलखोल कँम्पेन रथामध्ये चेंबूरमध्ये दगडफेक केली आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतले आहे. कोर्टात जाऊ असे ते म्हणत आहेत. कोणी दगड मारला तर तुम्ही कोर्टात जाता का? या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप पुन्हा पोलीस स्टेशनला घेराव घालेल. पोलिसांची भाषा आरोपींना पाठीशी घालणार आहे, असं सांगतानाच आमचा कोणावर संशय आहे राजश्री पलांडे यांनी थेट सांगितलंय.पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे.अज्ञाताविरोधात तक्रार दाखल झाले आहे. कुठल्याही गर्दुल्याला किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार अस चालणार नाही. असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन असा इशारा दिला आहे. आमच्या तक्रारीत प्रमुख संशयित आरोपी शिवसेनेचे कार्यकर्ते असा आरोप आम्ही आमच्या जबाबात केला आहे. आमच्या स्थानिक माजी नगरसेविका राजश्री पलांडे यांनी संशयितांची नावे दिले आहेत.असे प्रवीण दरेकर यांनी सांगितलं

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.