सौ.जयश्री अर्जुन माघाडे, किशोर रनशूर, गणेश ठोकळे यांची विलेपार्ले तालुक्यावर नियुक्ती
मुंबई: विलेपार्ले बैठकीत महिला आघाडीच्या कार्यध्यक्षा पदी मा.सौ. जयश्रीताई अर्जुन माघाडे यांची तर बेसिकच्या सचिव पदी मा.किशोर रनशूर यांची तर विलेपार्ले तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून मा.गणेश प्रभाकर ठोकळे यांची नियुक्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम विश्वशांती बुद्ध विहार, अंधेरी-कार्गो रोड, अंधेरी पूर्व या ठिकाणी झाला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस मा.किसनराव रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस रिपाई मुंबई प्रदेश कमिटीचे रतन अस्वारे, प्रा.अर्जुनराव माघाडे, लेरॉन गोंसलवीस, के.एस. गायकवाड, जिल्हा कार्यध्यक्ष नागेश तांबे, तालुका अध्यक्ष मा.दिपक डी. साळवी विलेपार्ले तालुका नेते रितेश घायवट, महेंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

