महाबळेश्वर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सातारा जिल्हा प्रशासना तर्फे स्वागत

0 झुंजार झेप न्युज

महाबळेश्वर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सातारा जिल्हा प्रशासना तर्फे स्वागत

सातारा दि.4: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाबळेश्वर दौऱ्यावर आजपासून आले आहेत. त्यांचे महाबळेश्वर येथील राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महाबळेश्वरचे तहसिलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम प्राधिकरण पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे अधिक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता मैथिली झाजुर्णे आदी उपस्थित होते.राजभवन येथील नुतनीकृत कामाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

महाबळेश्वर येथील नुतनीकृत गिरीचिंतन बंगला व कक्ष क्र. 15 ते 18 अतिथी गृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.