'रेड झोन' कमी करण्याबाबत लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल : राजनाथ सिंह
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड मधील सुमारे 6 लाख लोकांशी संबंधित तसेच शेकडो भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला 'रेड झोन' कमी करण्याबाबत लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल,लोकहिताच्या दृष्टीने तांत्रिक बाजूचे पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.संत तुकाराम नगर येथील डॉ.डी.वाय पाटील विद्यालयातील पदवी प्रदान सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आले होते.या कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत आमदार महेश दादा लांडगे यांनी 'रेड झोन'संदर्भातील निवेदन दिले. यावेळी भाजप सरचिटणीस विजय फुगे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर आदी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री यांना दिलेले निवेदनात आमदार महेश दादा लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड हे शहर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून विकसित होत आहे. औद्योगिक वसाहत म्हणून हे शहराची ओळख आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून संरक्षण विभागाचे दिघी, देहूरोड आणि ॲम्युनिशन डेपो आहेत. या ठिकाणी संरक्षण विभागाने 'रेड झोन' तयार केले आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये गेल्या वीस वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी रेडझोन ची हद्द कमी करण्याचा मुद्दा लावून धरत आहेत मात्र अद्याप संरक्षण विभागाने सकारात्मक भूमिकेतून निर्णय घेतला नाही. सध्या रेट जाऊन 2000 यार्ड पर्यंत मर्यादित असून शहरातील लाखो लोकांची घरे उद्योग आणि व्यवसाय यांवर परिणाम होत आहे. दुसरीकडे या भागात कोणतेही विकासकाम मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक महापालिका प्रशासनाला अडचणी येत आहेत.
शहरातील सुमारे 50 हजार घरे रेड झोन मुळे बाधित आहे या भागात वास्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या सुमारे सहा लाख इतकी आहे. विशेष म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांचा जमिनी रेड झोन मध्ये असल्याने आणि कुटुंब भूमिहीन झाले आहेत. संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 500 ते 700 मीटर इतकी रेडझोन ची हद्द असावी, असा अहवाल दिला असताना संरक्षण विभागाने 2000 मीटर इतकी हद्द ठेवले आहे असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रोड झोन बाबत दिल्ली संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये तांत्रिक बाजूंची पडताळणी करून निश्चितपणे हा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
स्व.मनोहर पर्रीकर कार्य राजनाथ सिंह पूर्ण करणार...
देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकारात्मक भूमिका घेत हा विषय मार्गी लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र मनोहर पर्रीकर यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे पुन्हा हा विषय मागे पडला. संरक्षण विभागाने स्थानिक नागरिक आणि कुटुंबांचा विचार करता सकारात्मक भूमिका घेतल्यास तांत्रिक अटींचा पूर्तता करून रेड झोन ची हद्द 500 ते 700 मीटर पर्यंत कमी होऊ शकते. भाजपचे धोरणाप्रमाणे समाजातील शेवटच्या घटकांचे विकासाचा विचार व्हावा. या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक निर्णय घेतल्यास रेडझोन बाधित लोकांना न्याय मिळणार आहे. स्व मनोहर पर्रीकर त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य आता विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पूर्ण करतील असा विश्वास आमदार महेश दादा लांडगे यांनी व्यक्त केला.

