रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना जबरीने लुटणारे चोरट्यांना चाकण पोलिसांकडून अटक

0 झुंजार झेप न्युज

रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना जबरीने लुटणारे चोरट्यांना चाकण पोलिसांकडून अटक,जबरी चोरीचे चार गुन्ह्यांची उकल

चाकण,दि.30: दि.30/04/2020 रोजी रात्री 10:00 वा. चे सुमारास प्रवीण धोंडीबा कोळी वय 44 वर्षे धंदा नोकरी रा.आंबेठाण चौक,चाकण ता.खेड जि.पुणे हे नेहमीप्रमाणे आळंदी चाकण रोड कामावरून घरी येत असताना मौज मेदनकरवाडी गावाचे आळंदी रोडवर फॉरेस्ट परिसरात दोन अनोळखी इसम पाठीमागून मोटरसायकलवर येऊन चाकण जाण्याचे रस्त्या बद्दल विचारले असता त्यांनी त्यांच्या स्कूटरचा वेग कमी केला असता सदर अनोळखी त्यांच्या स्कूटरला पायाने लाथ मारून खाली पाडले व प्रवीण कोळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील ॲक्टिवा स्कूटर नंबर एम एच 14 जी सी 2704, रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम 2500 रु. तसेच त्यांचे एटीएम कार्ड व गाडीचे आसीबुक असा एकूण 50,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी करून आळंदी बाजूकडे पळून गेले होते.

सदर घटनेबाबत चाकण पोलिसांना माहिती मिळताच चाकण पोलिसांनी आळंदी रोडने ग्रस्त करण्यास सुरुवात केली व आरोपींचा शोध घेत असतानाच रात्री 11/15 वा.चे सुमारास वरील आरोपींनी पुन्हा अशा प्रकारचे सावज शोधत अनिल कचरू मगर वय 36 वर्षे धंदा नोकरी रा.केळगाव ता. खेड जि. पुणे हे रस्त्याने आळंदीत बाजूकडे जात असतांना अनिल मगर यांना पत्ता विचारण्याच्या बहाना करत वरील अनोळखी इसमांनी त्यांचे मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडून त्यांना रस्त्याच्या बाजूचे खड्ड्यात नेऊन मारहाण करत त्यांच्याकडील सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ व 5000/-रु रोख रक्कम मासे 7500/- रु. चा मुद्देमाल जबरीने चोरी केलेल्या त्यामुळे जबरी चोरी करणारे दोन इस्मा पैकी एकाला अनिल मगर यांनी पकडून आरडाओरडा सुरू केली असता सदर ठिकाणी रात्री गस्तीचे पोलिसांनी पकडलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव रुपेश रामभाऊ जायभाय वाय 20 वर्ष रा.चाळीस फुटी रोड आळंदी,ता. खेड जि.पुणे असे सांगितले तसेच पळून गेलेले त्याचा सहकारी शुभम बंडु भगत वय 21 वर्ष रा.सदर असे सांगितले. चाकण पोलिसांनी सदर शुभम भगत यास ताब्यात घेतले व दोन्ही आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल मोटारसायकल व मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल असा एकूण 98,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच त्याच्याकडून आणखी दोन जबरीने चोरी केलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.

फिर्यादी प्रवीण धोंडू कोळी यांचे फिर्यादी वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुरणं 687/2022 भादवि कलम 392,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच अनिल कचरू मगर याचे फिर्यादीवरून गुरणं 688/2022 भादवि कलम 392,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे वरील आरोपींना अटक करण्यात आलेले असून त्यांच्याकडे केलेले तपासामध्ये त्यांचा सहकारी नावे नवनाथ हरिमकर वय 22 वर्षे राहणार पद्मावती रोड आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे चोरीचे गुन्हे करण्यास त्याचा सहकारी असल्याचे उघड झाले आहे असून त्यात सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले वरील आरोपींकडून जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्याची उकल झालेली आहे एकूण 125,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

1) गुरनं 387/2022 भादवि कलम 392,323,34 प्रमाणे

2) गुरानं 688/2022 भादवि कलम 392,323,34 प्रमाणे

3) गुरानं 391/2022 भादवि कलम 392,323,34 प्रमाणे 

4) गुरानं 464/2022 भादवि कलम 392,34 प्रमाणे

सदरची कारवाई माननीय पोलिस आयुक्त श्री अंकुश शिंदे साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री मंचक इप्पर , सहपोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे , सपोनि प्रसन्न जऱ्हाड,सपोनी विक्रम गायकवाड पोझई सागर बामणे,सुरेश शिंगे पोहवा संदीप सोनवणे, राजू जाधव, पोना हनुमंत कांबळे,मच्छिंद्र भांबुरे,निखिल शेटे, नितीन गुंजाळ , प्रदीप राळे निखिल वर्पे यांनी केलेली आहे, सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.