केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केले मशिदींचे संरक्षण

0 झुंजार झेप न्युज

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केले मशिदींचे संरक्षण

मुंबई,दि.7: मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या सबविधानविरोधी भूमिकेला सडेतोड उत्तर देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सामाजिक ऐक्यासाठी माशिंदावरील भोंगे कुणाला ही जबरदस्ती काढू देणार नाही ; संविधानाचे राज्य असून कुणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ते मशिदींचे संरक्षण करतील असा इशारा दिला होता त्यानुसार राज्यभरातील मशिदींना भेट देऊन रिपब्लिकन कार्यकर्त्यानी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना हिम्मत दिली. मुंबईत वर्सोवा येथे रिपाइं चे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दिवसभर येथील माशिदीं जवळ ठिय्या मांडत मुस्लिम बांधवांना साथ दिली. तसेच पुण्यात शैलेंद्र चव्हाण; निलेश भाऊ आल्हाट;नाशिक मध्ये प्रकाश लोंढे तसेच नवी मुंबई;सांगली; कोल्हापूर आदी अनेक रिपब्लिकन कार्यकर्त्यानी मशिदींचे संरक्षण केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.