"नामांतर शहीद" स्मारक ला राज्य शासनाची परवानगी...

0 झुंजार झेप न्युज

 "नामांतर शहीद" स्मारक ला राज्य शासनाची परवानगी...

औरंगाबाद,दि.7: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये नामांतर शहीद स्मारक उभारलं गेलं पाहिजे यासाठी सातत्याने फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते आंदोलन करत होते त्याच अनुषंगाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नामांतर वाद्याची भूमिका समजून घेऊन नामांतर शहीद स्मारक करण्यात येईल अशी घोषणा केली आणि 14 जानेवारी 2022 रोजी नियोजित जागेत भूमिपूजन पण विद्यापीठाच्या मार्फत करण्यात आले होते परंतु राज्य शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र कालपर्यंत विद्यापीठ प्रशाला मिळालं नाही त्याच अनुषंगाने औरंगाबाद मधील सर्वपक्षीय युवक विद्यार्थी समितीच्या वतीने विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्याच अनुषंगाने आज रोजी राज्य शासनाने स्मारकासाठी ना हरकत प्रमाणपत्र विद्यापीठ प्रशासनाला पाठवलेला आहे. राज्य शासनाचे. विद्यापीठ प्रशासनाचे. तसेच या मागणीसाठी ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले अशा सर्वांचे मनापासून अभिनंदन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.