गोरक्षकांची सतर्कता गोतस्करांना दणका
जुन्नर : मंगळवार दि. ३१/५/२०२२ या दिवशी रात्री नऊ वाजता बेल्हा येथून टाकळी ढोकळेश्वर मार्गे नगरच्या कत्तलखान्या मध्ये दहा टायर ट्रक क्रमांकMH-05AM-1061 या वाहनातून गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी ॲड.निलेशजी आंधळे यांना मिळाली त्यांनी बजरंग दलाचे गोरक्षक मानद पशु कल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण यांना सदर माहिती कळवून सांगितले की अर्ध्या तासाच्या आत गाडी अडवली नाही तर गोरक्षण होणे कठीण आहे पण त्यानंतर गाडीच्या प्रवासाचा मार्ग आणि निश्चित आहे अभिजीत चव्हाण यांनी आपल्या संपर्कसुत्रा मार्फत सदर ट्रकचा पाठलाग करण्याची तसेच पोलिस मदत मिळवून ट्रक अडवण्याची योजना बनवली आणि त्यानंतर गोरक्षक मिलिंदभाऊ एकबोटे,ॲड.निलेशजी आंधळे,ॲड मंगेश नढे अभिजीत चव्हाण यांनी नगर जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यानंतर पोलीस यंत्रणेने टाकळी ढोकळेश्वर पोलीस चौकी जवळ गाडी ताब्यात घेऊन कारवाई केली यावे गोतस्करांना थांबवणे हे कष्टाचे काम होते परंतु श्रीी. साळवे (पो.अ.) आणि त्यांचे सहकारी यांनी गाडीचा पाठलाग केला त्यामुळे अशक्य ते शक्य झाले पोलिसांच्या तत्परतेमुळे १६ गाईंचे प्राण वाचले पोलीस अधिकारी श्री.साळवेआणि त्यांचे पोलिस सहकारी यांचे हार्दिक अभिनंदन
या गाडीतील १६ गाई नगर येथील पांजरपोळ गोशाळे मध्ये पाठवण्यात आल्या त्यामुळे प्राणी संरक्षण कायदा पायदळी तुडवून गोवंशाची अनिर्बंध कत्तल करणाऱ्या गोतस्करांना चांगलाच दणका बसला.

