इको ट्रॅकचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आला

0 झुंजार झेप न्युज

इको ट्रॅकचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आला.

पिंपरी चिंचवड,दि.3: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात १३ इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ निगडी येथील भक्ती शक्ती ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत तयार करण्यात येणाऱ्या इको ट्रॅकचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.या भूमिपूजन प्रसंगी कोनशिलेचे यावेळी अनावरण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहाल, माजी नगरसेवक तानाजी खाडे, सचिन चिखले, प्रसाद शेट्टी, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, माजी नगरसेविका सुमन पवळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.     

महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात १३ इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. इको ट्रॅकच्या कडेने विद्युत खांब उभारून तसेच वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंगची कामे करण्यात येणार आहेत. ६ ते ८ मीटर रुंदीचे आणि १ हजार १०० मीटर लांबीचे मातीचे ट्रॅक तयार करण्यासाठी ९० लाख २७ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगर रोड येथे १ हजार सातशे पन्नास मीटर लांबीचा इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तसेच बिजलीनगर ते आकुर्डी स्टेशन येथे १ हजार मीटर, धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर १ हजार मीटर, स्पाइन रोड सहकारनगर ते टाटा मोटर आठशे पन्नास मीटर, कोकणे चौक ते शिवाजीनगर (रहाटणी) येथे सातशे मीटर, नाशिक फाटा ते भोसरी येथे २ हजार मीटर, पिंपळे सौदागर येथे १ हजार पाचशे मीटर, वेणुनगर वसाहत येथे सातशे मीटर, स्पाइन रोड कृष्णानगर ते जाधववाडी येथील सरकार चौक येथे २ हजार चारशे पन्नास मीटर, सांगवी येथील पी.डब्ल्यू. डी. मैदान या ठिकाणी १ हजार पाचशे मीटर, चिखली येथील घरकुल ठिकाणी नऊशे मीटर आणि प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रासमोर पाचशे मीटर लांबीचे असे एकूण १५ हजार नऊशे पन्नास मीटर लांबीचे इको जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. सदर इको ट्रॅकच्या प्रकल्पाला १२ कोटी पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.