पिंपरीचे आ. अण्णा बनसोडे यांच्याकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी 15 किलो चांदी भेट

0 झुंजार झेप न्युज

पिंपरीचे आ. अण्णा बनसोडे यांच्याकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी 15 किलो चांदी भेट

पिंपरी चिंचवड : कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर अगदी जोशात व भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडणार आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावतीने यावर्षीच्या पालखी सोहळ्यातील जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी रथाच्या मखरासाठी, सिंहासनासाठी व पादुकांसाठी जवळपास 15 किलो चांदी अर्पण करण्यात आली. यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.माणिक महाराज मोरे, ह.भ.प.संतोष महाराज मोरे, ह.भ.प संजय महाराज मोरे, ह.भ.प मधुकर महाराज मोरे यांना बोलवून यथोचित पूजा करून १५ किलो चांदी अर्पण केली.या चांदी पासून पालखी सोहळ्याच्या पादुका, सिंहासन, मखर, व अभिषेकासाठी लागणारी परात बनविण्यात येणार आहे.

याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त यांच्या सोबत शेखर कुटे, गुलाब कुटे,रमेश बापू लांडगे, अनिरुद्ध मोरे,संजय ढमाले,सतीश लांडगे,संजय औसरमल, शशिकांत घुले, संदीप चिंचवडे, नीता ढमाले, सचिन वाल्हेकर व सिध्दार्थ बनसोडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया

संत तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य आहेत. ज्या कुळामधे सात्विक वृत्तीची मूली – मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखिल हरिख वाटतो . अशी सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात , विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात. अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.