पोलादपूर तालूक्यात मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम संपन्न

0 झुंजार झेप न्युज

 पोलादपूर तालूक्यात मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम संपन्न

अलिबाग. दि.08- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालूक्यात आगामी मान्सून कालावधीची पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार मौजे माटवण व मौजे वाकण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी पूर, दरड कोसळणे यासारख्या आपत्ती येण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, दरडी घसरण्यापूर्वीची लक्षणे, शासनाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

 या कार्यक्रमास तहसिलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.चंद्रकांत कळंबे व श्रीमती सुमन कुंभार, मंडळातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.