विविध विभागांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0 झुंजार झेप न्युज

विविध विभागांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर,दि.15: आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग जसे पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

नागरिकांना या विभागांशी निगडित माहितीची आवश्यकता असेल, जसे की धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग नद्यांची पाणी पातळी तसेच जिल्ह्यातील कोणते मार्ग सुरू आहेत किंवा कोणते मार्ग बंद आहेत इत्यादी बाबतच्या माहितीसाठी नागरिक या विभागांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात. या नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

१) जिल्हाआपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय

टोल फ्री क्रमांक- १०७७

दूरध्वनी क्रमांक-

२६५९२३२/२६५२९५०/२६५२९५३/२६५२९५४

२) जिल्हा परिषद -आरोग्य  

    २६६१६५३

३) पोलिस विभाग-

   २६६२३३३/११२

४) सार्वजनिक बांधकाम- २६५१४५७ 

५) जिल्हा परिषद बांधकाम- ९९७५०९८६८९ (सचिन खाडे)

६) राष्ट्रीय महामार्ग- २६५२९६०

७) पाटबंधारे- २६५४७३६

८) महावितरण- ७८७५७६९१०३

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.