रेस्क्यू ऑपरेशनच्या मदत व सहकार्यासाठी औरंगाबाद आर्मी कॅम्पचे मेजर पाटील व महेंद्रसिंग यांची जिल्ह्याला भेट

0 झुंजार झेप न्युज

रेस्क्यू ऑपरेशनच्या मदत व सहकार्यासाठी औरंगाबाद आर्मी कॅम्पचे मेजर पाटील व महेंद्रसिंग यांची जिल्ह्याला भेट 

वाशिम,दि.3: मान्सूनपूर्व तयारी म्हणून जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला तर गावातील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून आणि पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनकरीता मदत व सहकार्यासाठी औरंगाबाद येथील आर्मी कॅम्प सज्ज असल्याची माहिती मेजर डी.एस. पाटील आणि सुभेदार महेंद्र सिंग यांनी नुकतीच वाशिम येथे जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री हिंगे यांची भेट घेऊन दिली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत व जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री.पिदडी उपस्थित होते.वाशिम दौऱ्यावर आलेले आर्मीचे मेजर श्री. पाटील आणि श्री महेंद्र सिंग यांनी एकबुर्जी प्रकल्पाला भेट दिली.जिल्ह्यातील नदयांच्या पाण्याची पातळी,जिल्ह्यातील प्रकल्पातील पाण्याची पातळी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांचा नदयांच्या पुरामुळे संपर्क तुटू शकतो याची माहिती देखील त्यांनी घेतली. 

जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेनबोरी, चिचंबापेन, बाळखेड आणि वाशिम तालुक्यातील उकळीपेन या गावांना पैनगंगा नदीच्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी औरंगाबाद येथील आर्मीचे शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात येते.जिल्ह्यात सन २००६ मध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यानंतर गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.पेनबोरी, चिचांबापेन व बाळखेडा येथून वाहणाऱ्या नदीवर पूल बांधलेले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर पुलावरून सुद्धा पाणी वाहते.अशी माहिती श्री.भगत यांनी आर्मीचे मेजर श्री.पाटील यांना यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.