केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

0 झुंजार झेप न्युज

रिपब्लिकन पक्षाला राज्य सरकार मध्ये मंत्रिपद मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना आश्वासन

मुंबई,दि.8: महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.नवे सरकार अडीज वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यानंतर ची 5 वर्षेही भाजप महायुतीचे सरकारलाच मिळतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल.असा विश्वास व्यक्त करत ना.रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रिपाइं चे युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; एम एस नंदा आदी मान्यवर उपस्थित होते. 

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या भाजप शिवसेना महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा द्यावा या मागणीबाबत ना.रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाला नक्की सत्तेत वाटा देऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना.रामदास आठवले यांना दिले. 

राज्य सरकार आता छोटे मंत्रिमंडळ करीत असून त्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला नक्की मंत्रिपद देण्यात येईल. तसेच महामंडळ आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला वाटा देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी आज माध्यमांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.