दावडी गावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट
खेड,(खेड ता. प्रतिनिधी बबनराव खेसे) : भागात विद्युत मोतर चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे या चोरांचे बंदोबस्त व्हावा आशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.दिघे वस्ती येथे ३जुलै २०२१ रोजी दोनच्या सुमारास टू व्हिलर व छोटा हत्तीच्या सहायाने एकाच रात्रीत पाच विद्युत पंप व वायर केबल,पाईप चोरण्यात आले आहेत.
त्यानंतर खेड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन गिलबिले,मोहन अवघडे दावडीचे ग्रामास्य यानी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले व अशा चोऱ्या ताबडतोप थांबल्या पाहिजे अशी आग्रही मागणी बाबासाहेब दिघे, विठ्ठल दिघे, माणिक दिघे, बाबुराव दिघे, कानिफ दिघे, दत्तात्रय दिघे, संदीप दिघे, संतोष होरे या शेतकऱ्यंकडून मागणी होत आहे.

