जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवर प्रवेशास मनाई

0 झुंजार झेप न्युज

 जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवर प्रवेशास मनाई.

वाशिम,दि.२८. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने भरले आहेत.अशा परिस्थितीत पावसाळी पर्यटनासाठी हौशी पर्यटक तलावांवर जाऊन आनंद लुटत असतात,अशा अतिउत्साहात अती धाडस करुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांवर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.   

जलसंपदा विभागाच्या एकबुर्जी व सोनल मध्यम प्रकल्प तसेच ईतर सर्व लघु प्रकल्पस्थळी देखील प्रवेश मनाई करण्यात आली आहे.अतिवृष्टी व पर्यटनस्थळी जास्त प्रमाणात गर्दी झाल्यास अपघाताची शक्यता असल्याने ही मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सर्व प्रकल्पस्थळी प्रवेश करण्याचा

प्रयत्न नागरीकांनी करू नये.प्रवेश केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल,याची नागरीकांनी नोंद घ्यावी. सुरक्षेच्या कारणास्तव या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे.असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.