नाते जिव्हाळ्याचे.. कार्य समृद्धीचे ...! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम.

0 झुंजार झेप न्युज

 नाते जिव्हाळ्याचे.. कार्य समृद्धीचे ...! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम.

पिंपरी चिंचवड,दि.02 : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात , स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यलढ्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. ११ ऑगस्ट 

२०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी “हर घर तिरंगा” उपक्रम.

दि.११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय / निमशासकीय /खाजगी अस्थापना/सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करावी. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे. आजादी का अमृत महोत्सव "घरोघरी तिरंगा" अर्थात "हर घर तिरंगा" या अभियानासंदर्भात महत्वपूर्ण बैठक आज आमदार लक्ष्मणभाऊ जगताप जनसंपर्क कार्यालय येथे संपन्न झाली. 

चिंचवड विधानसभेतील उपस्थित सर्व मा.नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, मा.स्वीकृत सदस्य यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत तसेच गणपती मंडळ, भजनी मंडळ, विविध धार्मिक संस्था यासर्वांपर्यंत अभियानाची योग्य ती माहिती पोहचवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्याप्रसंगी मा.महापौर सौ.माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेवजी ढाके, प्रभारी चिंचवड विधानसभा मतदारसंघ श्री.संतोषजी कलाटे आणि भाजपाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, मा.स्वीकृत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.