घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) बाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रेचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) बाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रेचे आयोजन

पिंपरी चिंचवड,दि.8: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील यमुना नगर सेक्टर २२ मध्ये आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) बाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.१५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून, देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांच्या आवाहनावरून, स्वातंत्र्य सैनिक तसेच शाहिदांना मानवंदना आणि त्यांची आठवण म्हणुन परिसर, नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी घरोघरी तिरंगा फडकवत हा उत्सव साजरा करण्याच्या हेतूने जनजागृती करण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, एस.एस.गायकवाड, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, राकेश सौदाई, महेंद्र साबळे, योगेश फल्ले, भुषण शिंदे, अमित सुतार, माजी नगरसदस्य सचिन चिखले, ज्ञानेश्वर शेळके, जनवाणी पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी स्व. मधुकरराव पवळे विद्यालय, काळभोर गोठा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यालयातील एकुण चारशेहून अधिक विद्यार्थी यामध्ये सामील झाले. विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करून, हातात संदेश फलक घेऊन, ढोल ताशे वाजवत, प्लॅस्टिक बंदी तसेच स्वच्छतेच्या घोषणा देत, "हर घर तिरंगा घर घर तिरंगा" बाबतची जनजागृती केली.स्व.मधुकरराव पवळे शाळा प्रांगणात सकाळी ८.०० वाजता प्लॅस्टिक बंदची शपथ घेऊन पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. तसेच डेंग्यू, हिवताप विषयावर देखील जनजागृती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.