स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पोलीस दलाच्या दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

0 झुंजार झेप न्युज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पोलीस दलाच्या दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

जालना,दि.14: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या अमृत महोत्सवी दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जालनावासियांसाठी ही दौड लक्षवेधी ठरली. राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 3 येथील मेन गेटवरुन अमृत महोत्सवी दौडला सकाळी प्रारंभ झाला. या दौडचा शुभारंभ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. 

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरीक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या दौडमध्ये पोलीसांसह मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ही दौड छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, टांगा स्टॅंड, मामा चौक, बसस्टँड ,विशालकार्नर, मोती बाग असे मार्गक्रमण करुन पोलीस परेड ग्राउंड येथे दौडचा समारोप झाला. या दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.