गणेश विसर्जन मार्गातील कामे पुर्ण करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

0 झुंजार झेप न्युज

 गणेश उत्सव; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मिरणूक मार्गाची पाहणी 

अकोला,दि.25: गणेश विसर्जन मिरणूक मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी निमा अरोरा व पोलिस अधक्षिक जी. श्रीधर यांनी केली. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्याची दुरूस्ती, विज वाहिन्या, केबल, अतिक्रमण इत्यादी कामे गणेश विसर्जनापूर्वी पुर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेत. 

शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी श्री मुर्तिचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे व सुरळीत पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकीपासुन विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा आदिसह विविध विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकी, दगडीपुल रोड, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, अकोट स्टँड, सुभाष चौक, मो.अली मशीद, जैन मंदीर रोड, गांधी रोड, सिटी कोतवाली असे मार्गक्रमण करीत विसर्जन स्थळ असलेल्या गणेश घाटाची पाहणी केली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.