कक्ष ११ , गु.प्र.शा. , गु.अ. वि . , कांदिवली -कथीत राणे महाराजे कडुन करोडो रुपयांचे लोन देण्याचे आमीष दाखवनाऱ्यास अटक
मुंबई: मॅन्डेट फी,विमा फी म्हणुन लाखो रुपये घेवुन कुठल्याही प्रकारचे लोन न देता आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश संजय बोर्डे गुन्हे प्रकटीकरण शाखा ११गु कांदिवली पश्चिम यांनी कथित राजे महाराज यांच्या नावाने करोडो चे लोन देणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली. व पैशाच्या अमित दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की
बंगलो नंबर २०५/२५७ , सेक्टर ०६ , चारकोप , कांदिवली प . , मुंबई ६७ पुरुष , वय - ४४ वर्षे ०२ गुन्हे शाखा , कक्ष- ११ कडील सपोनि विशाल पाटील यांना अशी माहिती मिळाली की , मुंबई शहरामध्ये काही ईसम हे ज्यांना बँका लोन देत नाही किंवा त्यांचे खाते एन पी ए झालेले आहे परंतु त्यांना मोठ्या रक्कमेच्या लोनची आवश्यकता आहे अशा व्यवसायीकांना एजंट मार्फत शोधुन त्यांना राजस्थान मधील कथीत राजे महाराजे यांचेकडे करोडो रुपये असुन ते त्यांना कमी व्याजदरात लोन स्वरुपात दयायला तयार आहेत असे सांगुन त्यांना करोडो रुपयांचे बिझनेस लोन देण्याचे आमीष दाखवुन नंतर मॅन्डेट फी , लोन विमा व इंग्लीश मॉरगेज स्टॅम्प डयुटीच्या नावाखाली त्यांचेकडुन करोडो रुपये घेवुन त्यांना कुठल्याही प्रकारचे लोन मंजुर न करता त्यांची करोडो रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळी बाबत गोपनीय माहीती प्राप्त झाली .
वरील माहितीवरून त्या इसमाची अशा प्रकारे फसवणूक केली गेली आहे अशा व्यक्तीचा शोध घेण्यात आला व त्यावरून फसवणूक झालेल्या का इसमाचे तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला. सध्या तक्रारदाराच्या अर्जाप्रमाणे वरिष्ठाच्या आदेशानुसार फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दी २१/९/२०२२ रोजी कक्ष कार्यालयपो नि घोणे सपोनि जाधव समपोनी यादव सपोनी पाटिल व अमलादार यांनी उल्हासनगर व अंबरनाथ जिल्हा ठाणे येथून सदर टोळीतील दोन संशयीतांना ताब्यात घेतले. व चौकशांती अटक करण्यात आली.
सदर अटक आरोपी यांचेकडे केलेल्या तपासांमध्ये त्यांनी गुन्हयातील पाहीजे आरोपी दिपक सौदा हा कधी बॅकेचा अधिकारी कधी राजस्थान मधील कथीत राजा महाराजा तर कधी मोठा शासकीय अधिकारी याचा रोल करीत असल्याचे सांगीतले असुन सदर पाहीजे आरोपी याचा शोध कक्ष - १ कार्यालयाकडुन चालु आहे . नमूद गुन्हयात खालील दोन आरोपीतांना अटक करण्यात आलेली असुन त्यांना पोलीस कोठडी रिमांडकामी मा . ३७ वे न्यायालय , किल्ला कोर्ट , मुंबई येथे हजर केले असता त्यांना दि .२८ / ० ९ / २०२२ पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे . अटक केलेल्या व्यक्तीचे वर्णन १ ) एक पुरुष , वय - ३८ वर्षे , रा.ठी. उल्हासनगर , जि . ठाणे २ ) एक पुरुष , वय - ३६ वर्षे रा.ठी. अंबरनाथ पुर्व , जि . ठाणे याव्दारे गुन्हे शाखेकडुन आवाहन करण्यात येते की , अशाप्रकारे कर्ज देणाऱ्या टोळीच्या आमीषाला बळी पडु नये व ज्यांची अशा प्रकारे फसवणुक | झालेली आहे त्यांनी त्यांची तक्रार ही गुन्हे शाखा , कक्ष- ११ , कांदिवली पश्चिम , मुंबई यांचेकडे नोंदवावी . सदरची यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त ( गुन्हे ) सुहास वारके , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) एस . विरेश प्रभू , पोलीस उप आयुक्त ( प्र- १ ) संग्रामसिंह निशाणदार , सहाय्यक पोलीस आयुक्त ( प्रकटीकरण - उत्तर ) काशिनाथ चव्हाण , प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली.

