"निक्षय मित्र योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना जीवनावश्यक वस्तूंची मदत "

0 झुंजार झेप न्युज

"निक्षय मित्र योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी चिंचवड,दि.24: क्षयरोग निर्मूलनातील महत्वपुर्ण असणाऱ्या केंद्र सरकारच्या "निक्षय मित्र" योजनेअंतर्गत गरीब व गरजू 25 क्षयरुग्णांना आज शहर क्षयरोग नियंत्रण केंद्र, आकुर्डी हॉस्पिटल येथे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे व महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले,यावेळी माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक शीतल शिंदे, तुषार कामठे, प्रसाद शेट्टी, सुलक्षणा शिलवंत(धर),उद्योजक विनोद आडसकर,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,शहर क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्यासह अनेक रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

"निक्षय मित्र" योजनेद्वारे सामाजिक बांधीलकीतून गरजू रुग्णांना मदत करता येते,हा सामाजिक जाणिवेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर व क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांनी केले.

" आम्ही शहरातील अनेक सामाजिक-राजकीय संघटना,दानशूर व्यक्ती, NGO यांना या निक्षय मित्र योजनेत सामावून गरजू रुग्णांपर्यंत जीवनावश्यक मदत पोहचवत आहोत, सर्वांनी या सामाजिक योजनेचे घटक व्हावे." असे आवाहन डॉ. होडगर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गवळी यांनी केले, चंद्रशेखर सरवदे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.