पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उदघाटन

0 झुंजार झेप न्युज

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उदघाटन 

वाशिम,दि.21: पालकमंत्री संजय राठोड यांनी आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. पालकमंत्र्यांच्या आगमनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार ऍड.किरणराव सरनाईक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस,सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम,वैद्यकीय अधिकारी डॉ. कावरखे,डॉ.लोणकर,डॉ.हरण यांचेसह अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री.राठोड यांनी स्त्री रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021 -22 च्या 4 कोटी 5 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या तीन अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाचे फित कापून उद्घाटन केले.या शस्त्रक्रियागृहामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्त्री रुग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाल्याचे मत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.