प्रवाह परीवार उपक्रम अनाथालयात सातपुते कुटुंबाकडुन मुलामुलींना कपडे व मिठाई वाटप
विहामांडवा,दि.27: (किशोर धायकर पैठण प्रतिनिधि): पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार उपक्रम अनाथालयातील अनाथ 29 मुला मुलींना लोकशाही पत्रकार संघटनेचे विभागीय सचिव कैलास सातपुते यांच्या कडुन अनाथ मुला मुलींना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले ,दरवर्षी प्रमाणे टाकळी अंबड येथील प्रवाह अनाथालयातील 29 मुलामुलींना कैलास सातपुते व त्यांच्या पत्नी सौ .शीलाताई कैलास सातपुते यांच्या हस्ते अनाथालयातील निराधार व अनाथ असलेल्या मुलामुलींना कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी सातपुते कुटुंबीयांचा आदर्श घेऊन परिसरातील दानशूर व्यक्तींनी प्रवाह अनाथालयाला जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन प्रवाह अनाथालयातील संचालक रामेश्वर गोर्डे यांनी केले तर मा उपसरपंच संजय निबाळकर यांनी सांगितले कि अनाथालयातील मुलांना भविष्यात डॉक्टर,इंजिनिअर,उच्चशिणासाठी आडचण आली, तर मी तत्पर मदत करेल ,यावेळी उपस्थितीत विहामांडवा येथील सरपंचपती नागेश अष्टीकर ,जिजामाता शाळेचे संचालक संजय राजे निंबाळकर , पत्रकार विक्रम थोटे ,पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस ,पत्रकार शब्बीर शेख ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर , प्रवाह अनाथालयाचे संचालक रामेश्वर गोर्डे , व अनाथालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

