पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवाहन !

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवाहन !

पिंपरी चिंचवड,दि.21: कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता काराची आकारणी व वसुलीची कारवाई करण्यात येते. या विभागाचा कार्यभार स्वीकारले नंतर हा विभाग नागरिकांशी थेट संबंध असणारा व महापालिकेचा स्थायी स्वरूपाचे उत्पन्न मिळवून देणारा विभाग असल्याने नागरिकांना लोकाभिमुख जलद सेवा देऊन येणाऱ्या सेवा पारदर्शी व गतिमान असणेचे दृष्टीने त्याचबरोबर महापालिका उत्पन्नात वाढ करून कामकाज करणे आवश्यक आहे. सध्याचे युग आधुनिक स्वरूपाचे असून नागरिकांचा कल सोशल मीडिया तसेच ऑनलाईन सेवा याच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांना मालमत्ता नोंदणीसाठी "माझी मिळकत, माझे आकारणी" या ऑनलाइन योजनेतील त्रुटी दूर करून सदर सेवा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. त्याचबरोबर मालमत्ता हस्तरांसाठी होणारा विलंबातील त्रुटी विचारात घेऊन ऑनलाईन असताना तर सुविधा सुरू केली.

मालमत्ता कर सवलत योजना थकबाकी नसल्याचा दाखला यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाणे येणे यामुळे श्रम वेळेचा अपव्यय विचारात घेऊन सर्व सवलत योजना तसेच विनाशुल्क थगवा की नसल्याचा दाखला ऑनलाइन सुविधा द्वारे देण्याचे सुविधा सुरू करण्यात आली आहे तसेच चालू वर्षात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्ता कर सवलतीपासून वंचित राहणे दिव्यांगांना कर सवलतीचा लाभ घेण्याची विशिष्ट कालमर्यादा यामध्ये नवीन धोरण अमलात आणून या घटकांना कर सवलतीचा लाभ सुविधा सुरू केली आहे.

नागरिकांच्या समस्याचे तात्काळ निवारण होणे कामे दरमहाकर संवाद योजना मालमत्ता कर 24X7 हेल्पलाइन सुविधा मालमत्तेच्या माहितीसाठी मोबाईल व मालमत्ता क्रमांक जोडणी कर भरण्यासाठी BBPS प्रणाली सुविधा यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित सेवा डिसेंबर अखेर ऑनलाइन करणेचाही पिंपरी चिंचवड महापालिकेचा मानस आहे.आपले कर भरण्यासाठी व इतर माहितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे www.pcmcindia.gov.in या वेबसाईटचा वापर करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.