श्री खंडोबा मंदिरामध्ये चंपाषठी कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न

0 झुंजार झेप न्युज

श्री.खंडोबा मंदिरामध्ये चंपाषठी कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न

पिंपरी चिंचवड: दि.29/11/2022 रोजी निगडी येथील श्री खंडोबा मंदिरामध्ये चंपाषठी कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न झाला या दिवशी मंदिरास फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती या दिवशी पहाटे 5 वाजता मंदिरातील शंकराच्या पिंढीस व खंडोबाच्या मुर्तीस योगेश शिवाजी काळभोर व सौ.काजल योगेश काळभोर आणि अमोल अनंत काळभोर व सौ. स्नेहल अमोल काळभोर यांच्या हस्ते अभिषेक करून आरती करण्यात आली तसेच संध्याकाळी 4 ते 7 वाजे पर्यंत थेरगाव येथील ओम श्री नाथ मल्हार यांनी मंदिराच्या सभा मंडपात जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला व 7 वा. महाआरती करण्यात आली या नंतर आलेल्या 5 ते 6 हजार भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी तानाजी काळभोर,शामराव काळभोर,शंकर आप्पा काळभोर,सोमनाथ काळभोर,जंगलीमहाराज काळभोर ,दिपक काळभोर,भाऊसाहेब काळभोर,अॅड राजेंद्र काळभोर, दत्तात्रय काळभोर,राजेंद्र ल.काळभोर,मार्तंड रेवी, संदीप केंदळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे,तानाजी खाडे, सचिन चिखले,अमित गावडे,माजी नगरसेविका शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर,लिलावती काळभोर,वडगाव चे नगरसेवक श्रीधर चव्हाण,अॅड जिजाबा काळभोर,अॅड प्रविणभाऊ झेंडे ,अॅड कृष्णाभाऊ दाभोळे, अॅड जालिंदर राऊत,अॅड दिपक चव्हाण,मारूती आप्पा काळभोर, शिवाजी काळभोर, तुकाराम काळभोर, सचिन काळभोर,बंडू काळभोर,दिलीप काळभोर,संभाजी काळभोर इ.उपस्थित होतेे. 

या वेळी महाराष्ट्र वारकरी महामंडाळच्या माध्यमातून चंपाषटी निमित्त 1008 श्री एकनाथी भागवत लिखाण पारायण करण्यासाठी 1008 श्रीएकनाथी भागवत व वही मोफत देण्यात येणार आहे त्तपूर्वी यावेळी श्रीएकनाथी भागवत व वही चे प्रकाशन सोहळा देहु देवस्थान संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे,विश्वस्त ह.भ.प. सुनिल महाराज मोरे, युवा किर्तनकार शेखर महाराज जांभूळकर, महाराष्ट्र वा.म.पिंपरी- चिंचवड चे अध्यक्ष विजय (आण्णा) जगताप, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, सदस्य कैलास कातळे, इंद्रसिंग राजपूत, सुधीर ढगे,किशोर पाटील, किसन नेटके,चनाप्पा हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक स्वरूपात 6 भाविकांना श्रीएकनाथी भागवत व वही मोफत देण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान पठारे व विश्वास थोरात यांनी केले व आभार तानाजी काळभोर यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.