श्री रेणुकादेवी शरद कारखान्याचा सातव्या गळीत हंगाम उत्साहात

0 झुंजार झेप न्युज

तिन लाख मेट्रिक टन ऊस गाळप चे उद्दिष्ट.

विहामांडवा,दि.11: (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) श्रीक्षेत्र चोंढाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या सातव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ करून गाळपात सुरुवात करण्यात आला.दि. ११ रोजी दुपारी १ वाजता रेणुका मातेच्या प्रतिमेचे पूजन विधिवत पूजन करुण कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व संचालक मंडळ यांच्या शुभास्ते संपन्न झाला. यावर्षी तीन लाख मे टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.यावेळी चेअरमन संदिपान भुमरे बोलतांना म्हणाले ऊसाला योग्य तो भाव देनार पुढे ते म्हणाले की गतवर्षी कारखान्याने दोन लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. कारखान्यांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती राजू नाना भुमरे,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब लबडे,व्हा.चेअरमन माणिकराव थोरे,किशोर चौधरी,नंदू पठाडे,सुभाष चावरे,विष्णू नवतर,संपत गांधले,रावसाहेब घावट,महावीर काला,लहू डुकरे,भरत तवार,कल्याण धायकर,दत्तात्रय वाकडे,ज्ञानोबा बोडखे,विष्णू नवथर,सुभाष गोजरे,

रेणुकादेवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर,रोहिदास रेवडकर,मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव बावडकर,श्रिमंत टेकाळे,संदीपान काकडे,सरपंच शिवराज भुमरे,सरपंच संजय थोरात,मा सरपंच आफसर शेख,मा उपसरपंच सुनील डुकरे,नाना गाभुड,पाडुरंग पवार, दिपक गाभुड,नितीन तांबे, बप्पा येळे,सुदाम येवले,बंडु बोडखे,राजेंद्र भाकरे,यांच्यासह वर्क मॅनेजर किशोर भिसे,प्रोडक्शन मॅनेजर आप्पासाहेब पेरने,केन मॅनेजर मच्छिंद्र जाधव,चीफ इंजिनिअर दत्तात्रय मालुसरे,चीप अकाउंटंट जयंत कुलकर्णी, गोडाऊन कीपर सोमनाथ मुळे, स्टोर कीपर सतीश देशमुख,परचेस ऑफिसर चंद्रकांत पाटील,हर्षद दुबाले,अनिल दुबाले, गणेश करताडे,प्रमेश्वर डुकरे,यांच्यासह तोडणी वाहतूक ठेकेदार,ऊस उत्पादक सभासद,शेतकरी व कामगार उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.