बौद्ध तरुणी स्वप्ना गायकवाड हीस अमानूष मारहाण

0 झुंजार झेप न्युज

पवई पोलीस निष्क्रिय 

मुंंई, दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री आठ वाजता स्वप्ना गायकवाड या तरुणीला गुंडानी मारहाण केली. पवई पोलीस ठाण्यांनी अद्याप गुंडांवर कारवाई न केल्याने संतापाचे वातावरण ननिर्माण आहे .याबाबतीत रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस बुधन पांडुरंग सावंत यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून गुन्हेगारांवर कारवाईची विनंती केली होती ,तरीदेखील आज पावेतर पवई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.आज दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांना समक्ष भेटून गुन्हा दाखल करण्यास विलंब का होत आहे? अशी विचारणा केली. ठाण्यात रिद्धी रशीदला हाताने धक्का दिल्यामुळे अवघ्या 24 तासात गुन्हा दाखल करण्यात आला. 

परंतु तीन दिवस झाले तरी स्वप्ना गायकवाड यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना मूहर्त सापडत नाही. पवई पोलीस ठाणे अनधिकृत बांधकाम, फाईव्ह स्टार हॉटेल यात व्यस्त असल्यामुळे स्वप्ना गायकवाड हीस न्याय मिळण्यास विलंब होत आहे,याची गंभीर दखल घेवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून बुधन सावंत यांची तडका फडकी बदली करण्यात यावी. अशी मागणी करणार असल्याचे रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.