नागरी आरोग्य संरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘जिजाऊ क्लिनिक’

0 झुंजार झेप न्युज

- आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते दोन ठिकाणी भूमिपूजन

- आरोग्य सुविधांमध्ये शहराला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प

पिंपरी चिंचवड,दि.18: वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘‘जिजाऊ क्लिनिक’’ उभारण्यात येत आहेत. त्यापैकी भूमिपूजन चऱ्होली आणि दिघी येथे करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चऱ्होली आणि दिघी येथे ‘‘जिजाऊ क्लिनिक’’ उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी चऱ्होलीतील भूमिपूजन समारंभास माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, विकास बुर्डे, सचिन तापकीर, संतोष तापकीर, बाबा तापकीर, नंदू दाभाडे, श्रीकांत तापकीर आदी उपस्थित होते. तसेच, दिघीतील भूमिपूजन समारंभास माजी उपमहापौर हिरानानी घुले, दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय परांडे, संजय गायकवाड, सांगळे गुरूजी, उदय गायकवाड, आमसिद्ध भिसे, कुलदीप परांडे, रामदास कुंभार, लहू परांडे, प्रमोद पठारे, ॲड. संजय नागरगोजे, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता शरीष पोरेड्डी, उपअभियंता सुनील पवार आदी उपस्थित होते. 

मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून भोसरी मतदार संघातील ३० ठिकाणी ‘‘जिजाऊ क्लिनिक’’ सुरू करण्यात येतील. त्यामुळे शहरातील वायसीएमसह अन्य शासकीय रुग्णालयावरील ताण कमी होणार असून, नागरिकांना आरोग्य सुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध होईल. 

प्रतिक्रिया : 

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये जिजाऊ क्लिनिक संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याचे भूमिपुजन आज चऱ्होली आणि दिघी येथे पार पडले. आगामी काळात भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध भागांमध्ये ३० ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे.- महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.