प्राथमिक आरोग्य केंद्र विहामांडवा येथे कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
विहामांडवा,दि.12 (किशोर धायकर पैठण प्रतिनीधी): पैठण तालुक्यातील विहामांडवा-येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर अनेक महिन्याच्या विश्रांतीनंतर संपन्न झाले. यावेळी एकुण ९ लाभार्थ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शस्त्रक्रिया सर्जन श्रीमती. हाश्मी मॅडम यांनी केल्या. त्यांना सहकार्य पर्यवेक्षिका श्रीमती. संगिता राख, श्रीमती. दराडे, श्रीमती. शेख, श्रीमती. टापरे व वैद्यकिय श्रीमती. शरयु दांडगे यांनी केले.
शिबीराचे यशस्वितेसाठी पर्क्षवेक्षिका श्रीमती. अभंग, कनिष्ठ सहाय्यक श्री.रवि गायकवाड, श्री. बेग, भैय्यासाहेब धुमाळ, पगारे, बनकर, शरद गोरे, गटप्रवर्तक श्रीमती. मुक्ता वाव्हळ, परिचर श्रीमती. संतोषी माने, विशाखा गोरे, आशा स्वंयसेविका श्रीमती. लता काळे यांनी केले. तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. अनिल मगर यांनी कुशल नियोजन करुन शिबीर यशस्वी केले.

