महापूर मैदानवर विनापरवाना मंडप उभारण्यात आला : सचिन काळभोर

0 झुंजार झेप न्युज

महापूर मैदानवर विनापरवाना मंडप  उभारण्यात आला : सचिन काळभोर

पिंपरी चिंचवड: महापौर नियोजित मैदानावर भव्य मंडप बिना परवाना उभारण्यात आला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व अ क्षेत्रिय कार्यालय तसेच वाहतूक पोलीस ह्याची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसून थेट पद्धतीने भव्य मंडप बिना परवाना उभारण्यात आला ह्या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सचिन काळभोर याःनी आ प्रभाग अधिकारी पानसरे मॕडम यांच्या कडे केली.महापौर मैदानावर मंडप उभारण्यात जात असतो त्या वेळी अ क्षेत्रिय कार्यालय मंडप उभारण्यासाठी मंडप परवाना शुल्क व जी एस टी रक्कम जमा करण्यात येत नाही का ? नियमानुसार शुल्क व जी एस टी रक्कम सहित बिना परवाना मंडप उभारण्यात आला त्या प्रमाणात रक्कम दंड वसूल करण्यात यावा .

१५ हजार स्केअर फुट मंडप बिना परवाना उभारण्यात आला असून आपण स्वतः दखल घ्यावी वाहतूक पोलीस निरीक्षक कारडे ह्यांना सुद्धा फोन केला होता तसेच इतर कर्मचारी यांच्या कडून माहिती घेण्यात आली कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही?१०० स्केअर फुट जागा भाडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ४७०० चार हजार सातशे रुपये आकारले जात आहे तर १५ हजार स्केअर फुट मंडप जागा भाडे किती झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्याची आथिर्क फसवणूक केल्याप्रकरणी गंभीर दखल घ्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  सचिन काळभोर यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.