संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विरोधात कोयमबेडू स्टेशन चेन्नई येथे तामिळनाडू राष्ट्रवादीकडून काँग्रेस तर्फे जोडे मारो आंदोलन.

0 झुंजार झेप न्युज

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विरोधात कोयमबेडू स्टेशन चेन्नई येथे तामिळनाडू राष्ट्रवादीकडून काँग्रेस तर्फे जोडे मारो आंदोलन.

चेन्नई: ७ वेळा संसदरत्न असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बेताल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात चेन्नई येथील कोयमबेडू स्टेशन चौकात तामिळनाडू चे प्रदेश अध्यक्ष पी.के.नरेश कुमार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड चे शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्याला जोडे मारले गेले. 

"अब्दुल सत्तार हाय हाय",

"अब्दुल सत्तार डाऊन डाऊन"

"५० खोके एक दम ओके" या घोषणा दिल्या गेल्या.यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्येकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला आहे. संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल बोलण्याची त्यांची लायकी नसून.तुमची सत्ता ही नेहमी राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला.आधी काँग्रेसशी गद्दारी करून शिवसेनेत प्रवेश केला,मग शिवसेनेशी गद्दारी करून मंत्री पद मिळवलं. ज्या दिवशी तुम्ही शिवसेना सोडली त्या दिवशी तुमच्या मतदार संघातून तुम्ही तुमचा जनाधार गमावला.तुमच्या अश्या बेताल वक्तव्य पाहून इथून पुढे तुमच्या घरातील महिला देखील तुम्हाला मत देणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अब्दुल सत्तार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करत नैतिकतेचा टिळा लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्काराची गोडवे गाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ED सरकार या बेताल भाषा बोलणारे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेते का याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेऊन असल्याची टीका त्यांनी केली.

बोलताना तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पी. के. नरेश कुमार म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दलची भाषा वापरली ती भाषा भारतीय संस्कृतीला शोभणारी नसून त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे कोणीही आमच्या नेत्यांना अशी प्रकारची भाषा वापरल्यास आज तामिळनाडूमध्ये फोटोला जोडे मारो आंदोलन घेत आहोत उद्या महाराष्ट्रात येऊन जोडे मारायला आम्ही कमी करणार नाही इशारा त्यांनी दिला.

तामिळनाडू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. पी.के.नरेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख,जी. राज्य सचिव श्री. अनिथा राज्य सचिव श्री. नादना सबपथी,युवक अध्यक्ष श्री. एसडीएच राजन, चेन्नई दक्षिण जिल्हा अध्यक्ष श्री, राजू,चेन्नईचे दक्षिण पूर्व अध्यक्ष श्री.शिवशंकर,NYC TN उपाध्यक्ष जया कुमार,युवक कार्यकारी समिती सदस्य सूर्य प्रकाशम,युवक सचिव रघु,युवक सरचिटणीस वेधा कृष्णन आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.