सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी काढले आयुक्तांचे वाभाडे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि मेडिनीला हेल्थकेअर प्रा.लि. यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्मार्ट पब्लिक टॉयलेटचा लोकापर्ण सोहळा आणि Awone delights या स्नॅक्स सेंटरचा उदघाटन सोहळा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र रेडझोनमध्ये उभारण्यात आलेले तसेच वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट पब्लिक टॉयलेटचा लोकार्पण सोहळा तसेच स्नॅक्स सेंटरचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शहरवासियांकडून आयुक्तांचा निषेध व्यक्त केला जात आहे. महापालिका आयुक्ता मेडिनीला हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाठबळ देत आहेत? रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम करून शौचालय व दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी स्वतः आयुक्त उपस्थित राहात आहे, शहरातील रेडझोनबाबत आयुक्त अनभिज्ञ असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
याबाबत सचिन काळभोर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आश्चर्यकारक अनुभव येत आहेत. आण्णा भाऊ साठे बस स्टॉप निगडी या ठिकाणी रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त स्वतः उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित रहाणार आहेत. त्या संदर्भात त्यांना विरोध दर्शविण्यासाठी जाहीर निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे
सामान्य नागरिकांना वेगळा नियम लावण्यात येतो आहे. सेक्टर 22 या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पुनवर्सन योजना अंतर्गत आठ इमारती बांधकाम संपूर्ण होऊन गेल्या बारा वर्षांपासून इमारत बिना वापर पडून असून, रेड झोन एरियामध्ये घर कधी मिळणार म्हणून फोटो पासधारक प्रतिक्षा करत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने घाईगडबडीने सदर इमारतीचे बांधकाम केले. त्या संदर्भात सीमाताई सावळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्या संदर्भात आजतागायत निर्णय लागला नाही. सदर इमारतीचे बांधकाम रेड झोन एरिया मध्ये येत असल्याने इमारत बिना वापर पडून आहे. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन काही पर्यायी मार्ग काढत नसून पुन्हा. स्वतः रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकामप्रकरणी पाठबळ देत आहे, असा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे.

