रेणुका माता जनसेवा ग्राम विकास पॅनल च्या प्रचाराचे नारळ फुटले
विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधि): ग्रुप ग्रामपंचायत चिंचाळा येथे 2022 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक येत्या 18 तारखेला होत आहे त्या अनुषंगाने रेणुका माता जनसेवा ग्राम विकास पॅनल चे पॅनल प्रमुख बाळासाहेब सुधाकर बोडखे, यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदाचे उमेदवार सौ कोळपकर अश्विनी अनिल, व श्रीमती बोडखे लक्ष्मीबाई सुधाकर, सौ शिंदे गीता सुदाम, करताडे अमोल श्रीमंत, सौ कारताडे मनीषा मनोहर, सौ थोटे कल्पना भागवत, श्री गावडे अशोक उत्तम, सौ पवार मुक्ताबाई रामचंद्र, श्री किशन बबन बर्डे, यांच्या प्रचारार्थ श्री रेणुका माता देवी यांच्या साक्षीनं नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी चिंचाळा, चोंढाळा, मिरखेडा, या तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

