व्यापारी बंधू व डॉक्टर्सचे महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी-चिंचवड,दि.02: निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलासमोरील बी. जी. कॉर्नर नावाचे व्यापारी संकुल आहे. या संकुलासमोर पीएमपीएल तिकीट बुकींगचे अनधिकृत कार्यालय आहे. तसेच या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे झाकले जात आहेत. परिणामी त्यांच्या व्यवसायावर संकट येत असल्यामुळे पीएमपीएलचे तिकीट कॅबिन नियोजित जागेवर हलवावे तसेच इतर विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. यावर ताबडतोब कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन येथील व्यापारी तसेच डॉक्टर्सनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.पीएमपीएलच्या तिकीट कॅबिनसाठी महापालिकेकडून पर्यायी जागा दिलेली आहे. मात्र ही कॅबिन या ठिकाणाहून हलविण्यास पीएमपीएलचे अधिकारी, कर्मचारी विरोध दर्शवित आहेत. तसेच येथील व्यापारी संकुलासमोर विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहेत.
बी. जी. कॉर्नर व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी हे नियमितपणे कर भरत असूनदेखील त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची खंत या व्यापार्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली. पीएमपीएलच्या अधिकार्यांना ही बाब वारंवार सांगूनदेखील हे अधिकारी अरेरावी तसेच मनमानी करतात. संकुलासमोर अनधिकृत टपर्यादेखील वाढल्या आहेत. यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील व्यापारी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर यांनी केली स्वाक्षरी
आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संजय जैन, प्रदीप काळे, अतुल अट्टल, प्रवीण अगरवाल, निलेश सौरे, मुकेश चौधरी, फुलाराम चौधरी, उषा दुलेरा, मंजू उपाध्याय, बोराडे, चंद्रकांत मेहता, जे. व्ही. ढेकणे, डॉ. संजय जेश्री, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, सोनी आदींची स्वाक्षरी आहे.

