इंटरनॅशनल वी लव यू फाउंडेशनच्या वतीने हडपसर गाडीतळ ते गोंधळेनगर पर्यंत २ किलोमीटर ३ टन प्लास्टिक कचरा गोळा
पुणे: दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८ च्या सुमारास इंटरनॅशनल वी लव यू फाउंडेशनच्या वतीने हडपसर गाडीतळ ते गोंधळेनगर पर्यंत २ किलोमीटर ३ टन प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला .स्वच्छ भारत अभियान मोहीम घेऊन जगाला आईचं प्रेम देण्यात आले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री रोहित दादा पवार , पुणे मनपाचे माजी महापौर सौ वैशालीताई बनकर, हडपसर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष मा. शंतनु जगदाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष मा.विक्रम जाधव
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर मा.अध्यक्ष सौ .अश्विनीताई परेरा, तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस हडपसर मतदार संघ अध्यक्ष श्रद्धा जाधव व महानगरपालिकेचे काही अधिकारी या मोहिमेमध्ये सहभागी होते.पूर्ण जगभरात संस्थेचे संस्थापक "झांग गील झा " यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर, नदी स्वच्छता, वृद्धाश्रमाला मदत, अनाथ आश्रमाला मदत व स्कूल बॅग वाटप असे विभिन्न प्रकारचे समाज कल्याणाचे कार्यक्रम वी लव यू फाउंडेशनच्या वतीने घेत असतात.

