अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक आढावा;आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा-विभागीय आयुक्त

0 झुंजार झेप न्युज

अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक आढावा;आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा-विभागीय आयुक्त

अकोला,दि.2: भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आढावा बैठकीत दिले.जिल्हाधिकारी यांच्या दालनात अमरावती विभाग पदविधर मतदारसंघ निवडणुक संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे, सहा.पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदि उपस्थित होते.

पदविधर निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र, वाहन व्यवस्था, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उपलब्धतेबाबत पूर्व तयारी ठेवावी. मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदारांची संख्या वाढवावी. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आवश्यक ते उपाययोजना राबवावी. घोषित निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहितेप्रमाणेच करावयाची असुन त्यात काटेकोर दक्षता पाळावयाची आहे, अस‍े निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले.    निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत असून मतदार नोंदणी अंतिम टप्यात चालू असल्याचे माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.