पिंपरी-चिंचवड भाजपाकडून 'शास्तीमाफी'चा जल्लोष शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार

0 झुंजार झेप न्युज

ढोल-ताशा- हलगीच्या तालावर पदाधिकाऱ्यांचा ठेका

पिंपरी चिंचवड,दि.21: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नियमबाह्य बांधकाम बांधकामांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली. या निर्णयाचे स्वागत करत शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा केला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शास्तीकर पूर्ण माफ करण्याबाबत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्य सरकारने शास्ती कर पूर्ण माफ करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे पिंपरी- चिंचवडकरांकडून स्वागत करण्यात आले.

मोरवाडी येथील भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर शास्तीकर माफीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आणि सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.